बंद

    शिवभोजन

    शिवभोजन
    • तारीख : 26/01/2020 -

    राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने दि. 01 जानेवारी, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवभोजन योजना दि. 26.01.2020 पासून सुरु केली आहे. शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व 1 मूद भाताचा समावेश आहे. शिवभोजन योजना कार्यान्वित करण्यासाठी “शिवभोजन ॲप्लिकेशन” विकसित करण्यात आले आहे. त्याचा वापर करुनच शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येते. शिवभोजन थाळ्या वितरीत करण्यापूर्वी लाभार्थ्याचे नाव व फोटो घेणे बंधनकारक आहे तर फोन नंबर वैकल्पिक आहे. या ॲपवर शिवभोजन केंद्र चालकास रोजचा मेन्यू प्रसिद्ध करता येतो.

    सद्यस्थितीत शिवभोजन योजनेचा प्रतिदिन इष्टांक 2.00 लक्ष एवढा आहे आणि राज्यात 1904 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. शिवभोजन केंद्रांवर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरीता सर्व शिवभोजन केंद्रांमध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व 100 मीटर परिघामध्ये जिओ फेंन्सिग सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांना शिवभोजन केंद्राच्या 100 मीटर परिघामध्येच शिवभोजन योजनेचे व्यवहार करता येतात. शिवभोजन योजना सुरू झाल्यापासून दि.27.03.2024 पर्यंत एकूण 18,83,96,254 शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    लाभार्थी:

    कोणतीही व्यक्ती

    फायदे:

    एका थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व 1 मूद भाताचा समावेश आहे.

    अर्ज कसा करावा

    सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 दरम्यान शिवभोजन केंद्रास भेट द्या
    (टीप: प्रत्येक शिवभोजन केंद्रावर प्लेट लिमिट आहे)