पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत वितरण
देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय म्हणून पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे दाणे (फोर्टिफाइड राईस केरने l- एफआरके) (जे तांदळाच्या पीठापासून बनलेले असतात व ज्यात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलिक ॲसिड व व्हिटामिन B12 यांसारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांचा समावेश असतो ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वाटप होणाऱ्या सर्वसाधारण तांदळात 1 (एफआरके) : 100 (सर्वसाधारण तांदळाचे दाणे) याप्रमाणात मिसळून, तयार होणारा फोर्टिफाईड तांदूळ (पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ) वितरीत करण्याचा निर्णय केंद्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. यानुसार केंद्र शासनाने दि.18 एप्रिल, 2022 रोजीच्या पत्रान्वये 100% केंद्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने खालील नमुद तीन टप्प्यात आयसीडीएस/पीएम पोशन (एमडीएम)/पीडीएस अंतर्गत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे.
- पहिला टप्पा (एप्रिल, 2021 ते मार्च 2022) : आयसीडीएस/एमडीएम (आता पीएम पोशन)
- दुसरा टप्पा (एप्रिल, 2022 ते मार्च 2023) : आयसीडीएस/एमडीएम (पीएम पोशन)/पीडीएस 4 मध्ये-/आकांक्षी/13-राज्यातील उच्च ओझे असलेल्या जिल्ह्यांमध्ये.
- तिसरा टप्पा (एप्रिल, 2023 ते मार्च, 2024) : आयसीडीएस/एमडीएम (पीएम पोशन)/पीडीएस/अन्य योजना (संपूर्ण देश)
- वरील तीन टप्प्यांपैकी आयसीडीएस/एमडीएम या योजनेतील लाभार्थ्यांना महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण विभागामार्फत फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यात येतो.
- शासनाच्या दि.17.10.2022 च्या शासन निर्णयान्वये राज्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्या अंतर्गत फोर्टीफाईड राईस च्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
- राज्यात सद्य:स्थितीत तिसऱ्या टप्प्याअंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये फोर्टीफाईड राईसचे वितरण चालू आहे.
लाभार्थी:
राज्यातील अंत्योदय अन्न योजन व प्रधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र नागरीक.
फायदे:
देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अॅनिमिया या समस्येवरील उपाय म्हणून लोह, फॉलिक अॅसिड व व्हिटामिन B१२ यांसारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांनी संवर्धीत फोर्टीफाईड राईसचे वितरण करण्यात येत आहे.
अर्ज कसा करावा
लागू नाही