एपीएल शेतकरी
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150/- इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्याबाबतचा निर्णय दि.28.02.2023 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार 14 जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ₹ 150/- प्रमाणे माहे जानेवारी 2023 ते मार्च,2023 या कालावधीकरीता एकूण 179.87 कोटी आणि माहे एप्रिल, 2023 ते जून,2023 या कालावधीकरीता एकूण 168.75 कोटी एवढा निधी संबंधित सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात रोख रकमा जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150/- इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरण
अर्ज कसा करावा
तहसील कार्यालयाला भेट द्या