बंद

    नियंत्रित साखर वाटप योजना

    साखर वितरणाची सुधारित पध्दत

    • केंद्र शासनाच्या दि.1 जुन, 2017 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार फक्त अंत्योदय अन्न योजनेतील 25,05,300 शिधापत्रिकाधारकांसाठी प्रती कुटुंब 1 किलो याप्रमाणे साखर वाटप करण्यात येते. त्यानुषंगाने राज्यासाठी 25,053 क्विंटल इतके साखरेचे दरमहा नियमित नियतनाची मर्यादा निश्चित केली आहे.

    • डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने आणि दि.17.05.2013 च्या आदेशान्वये साखरेवरील नियंत्रण हटविल्यामुळे साखर खुल्या बाजारातून खरेदी करून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येते. राज्य शासनाकडून खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेसाठी व अनुषंगिक खर्चासाठी केंद्र शासन प्रति क्विंटल रू.1850/- एवढे अनुदान उपलब्ध करुन देते.

    • शासन निर्णय क्र. साखर 1117/प्र.क्र.65/ना.पु.19, दि.15 सप्टेंबर, 2017 अन्वये जून 2017 या महिन्यापासून अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटूंब 1 किलो दरमहा रु.20/- प्रति किलो याप्रमाणे साखर वितरीत करण्याबाबत राज्य शासनाने निश्चित केले आहे.

    • सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्य शासन एनसीडीईएक्स स्पॉट एक्स्चेंज लि. (आता नामकरण एनसीडीईएक्स ई-मार्केटस् लि.) मार्फत विभागनिहाय ई-लिलावाद्वारे तीन महिन्यातून एकदा ऑनलाईन साखर खरेदी करते आणि त्याचे नियमितपणे जिल्हा व तालुकानिहाय वितरण करण्यात येते.