इतर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत द्वार वितरण योजना
सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्रातील तालुक्यांमध्ये द्वार वितरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गोदामापासून स्वस्त धान्य दुकानापर्यंत शासकीय खर्चाने शासकीय वाहनातून अन्न धान्याची वाहतूक करण्यात येते.
ही योजना, आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आली असून, अवर्षण प्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनमार्फत कार्यान्वित केली आहे.
द्वार वितरण योजना शासकीय वाहनाद्वारे राबविण्यासाठी ही योजना कार्यान्वयन करणार्या यंत्रणांना येणार्या सर्व खर्चाची प्रतिपूर्ती आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील तालुक्यांमध्ये प्रति क्विंटल रू.१५.०० या दराने तर अवर्षण प्रवण तालुक्यामध्ये प्रति क्विंटल रू.१३.०० या दराने करण्यात येते.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर राशी
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रु.15000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी अदा करण्याचा निर्णय दि.24.02.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. यानुसार सन 2022-23 या कालावधीत वरील प्रमाणे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी अदा करण्यात आली होती.