बंद

    अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम

    निकषात न बसणाऱ्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात याव्यात व संबधितांच्या मागणीनुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, मयत व्यक्ती व अपात्र शिधापत्रिकांसाठी शोध मोहिम घेऊन त्या रद्द करण्याचे निर्देश शासन परिपत्रक दिनांक 17.07.2019 नुसार देण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 28.01.2021 च्या शासन परिपत्रकान्वये अपात्र शिधापत्रिका विशेष शोध मोहिम राबविण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यांमधील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव, मनुष्यबळाचा अभाव इ.मुळे अपात्र शिधापत्रिका मोहिमेस दिनांक 01.04.2021 च्या शासन परिपत्रकान्वये स्थगिती देण्यात आली आहे.