बंद

    शिवभोजन

    राज्य सरकारने गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात ₹ १०/- प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देण्यात येणा-या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व १ मूद भात रुपये १० इतक्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ₹ ५०/- व ग्रामीण भागामध्ये ₹ ३५/- इतकी राहील. प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या ₹ १०/- एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून शासन देणार आहे. सदर योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्हा मुख्यालयी व महानगर पालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे.


    गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात “शिवभोजन” उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय १.१.२०२० पहा(492 केबी)

    गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात “शिवभोजन” उपलब्ध करुन देण्याबाबत परिपत्रक ६.१.२०२० पहा(967 केबी)

    “शिवभोजन” केंद्रावर घ्यावयाची दक्षता परिपत्रक १८.१.२०२० पहा(396 केबी)