वैध मापनशास्त्र यंत्रणा
वैध मापनशास्त्र ही वजन माप विषयक अधिनियम व नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचे विभाग प्रमुख नियंत्रक, वैध मापनशास्त्र आहेत. या विभागांतर्गत असणार्या निरीक्षक विभागाच्या कार्यालयाकडून व्यापार उदीमामध्ये/ उपयोगकर्त्याकडे असलेल्या वजन व मापांची पडताळणी केली जाते व त्या वजन मापावर मुद्रांकन केले जाते. वजन माप विषयक कायद्यातील तरतुदी ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षणार्थ कायदा/ नियमांची अंमलवजावणीचे काम पाहिले जाते. ग्राहक तक्रारींकरिता हेल्पलाईन नियंत्रक, वैध मापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयात कार्यरत असून कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२२०२२ वर तक्रारी स्विकारण्यात येतात. वैध मापनशास्त्र यंत्रणेची अधिक माहिती legalmetrology.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या यंत्रणेकडून खालीलप्रमाणे अधिनियम व नियमांची अंमलवजावणी केली जाते.
- वैध मापनशास्त्र अधिनियम, २००९
- वैध मापनशास्त्र (सर्वसाधारण)नियम, २०११
- वैध मापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियम, २०११
- महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम, २०११
- वैध मापनशास्त्र (नमुना मान्यता) नियम, २०११
- वैध मापनशास्त्र (न्युमरिक) नियम, २०११
- भारतीय विधीक माप संस्था नियम, २०११