राज्य व जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण परिषद
राज्य ग्राहक संरक्षण परिषद
दि. २९/०८/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य स्तरावर राज्य ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे. सदर परिषदेवर एकूण ५२ सदस्यांची संख्या असतात. त्यापैकी १७ अशासकीय सदस्य असतात. ग्राहक संरक्षणाशी संबंधित असलेल्या विविध शासकीय/अशासकीय अधिकारी तसेच ग्राहकांच्या हिताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांची परिषदेवर निवड केली जाते. राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष मा.मंत्री, अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे असतात. या परिषदेचा कालावधी ३ वर्षाचा असतो.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद
दि. २९/०८/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे. सदर परिषदेवर एकूण ४२ सदस्य असतात. जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. या परिषदेचा कालावधी ३ वर्षाचा असतो.
ग्राहक कल्याण सल्लागार समिती
राज्यात ग्राहक चळवळींना प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण भागात पसरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंबंधी शासनाला सल्ला देण्यासाठी शासन निर्णय दि.१०/५/२००१ अन्वये ग्राहक कल्याण सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. तथापि, शासनास अपेक्षित असलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने सदर समिती दि.०३/०२/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये बरखास्त करण्यात आली आहे.