कल्याणकारी संस्था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्यादी संस्थांना बीपीएल दराने धान्य वितरणाची योजना
केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत राज्यातील कल्याणकारी संस्था व वसतीगृहांना प्रत्येक लाभार्थ्यास दरमाह 15 किलो याप्रमाणे अन्नधान्याचे बीपीएल दराने (गहू व तांदूळ) वितरण करण्यात येते.
केंद्र शासनाने कल्याणकारी संस्था व वसतिगृहे या योजनेंतर्गत फक्त शासनाच्या मालकीच्या व शासन चालवित असलेल्या संस्थानाच नियतन वितरित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. तथापि, कल्याणकारी संस्था व वसतीगृहे योजनेंतर्गत शासनाच्या मालकीच्या व शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या कल्याणकारी संस्थासह, शासन अनुदानित कल्याणकारी संस्था व वसतीगृहांमधील लाभार्थ्यांसाठी नियतन मंजूर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने दिनांक 13.02.2020 च्या पत्रान्वये घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यात 3,174 कल्याणकारी संस्था व वसतीगृहे व त्यामध्ये 3,34,801 लाभार्थ्यांची नोंद एईपीडीएस प्रणालीवर आहे.
या योजनेंतर्गत कल्याणकारी संस्था व वसतीगृहांमधील लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक 27.12.2023 च्या पत्रान्वये माहे ऑक्टोबर, 202३ ते मार्च, 2024 या सहामाही कालावधीकरीता एकुण 10,490.178 मे. टन अन्नधान्य (6261.186 मे. टन गहू व 4228.992 मे. टन तांदूळ) नियतन मंजूर झाले असून ते शासन आदेश दिनांक 28.12.2023 अन्वये क्षेत्रीय कार्यालयांना वितरित करण्यात आले आहे.