आनंदाचा शिधा
सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:-
दि. 04.10.2022 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ई-पॅास प्रणालीद्वारे 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या विशेष शिधाजिन्नस संचांचे वितरण ₹ 100/-प्रति संच या दराने करण्यात आले आहे. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या 1.61 कोटी शिधाजिन्नस संचांपैकी 1.61 कोटी शिधाजिन्नस संचांचे (सुमारे 100%) पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
सन 2023 गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त शिधाजिन्नस संचांचे (आनंदाचा शिधा) वितरण:-
दि. 22.02.2023 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ई-पॅास प्रणालीद्वारे 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या विशेष शिधाजिन्नस संचांचे वितरण ₹ 100/-प्रति संच या दराने करण्यात येत आहे. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या 1.59 कोटी शिधाजिन्नस संचांपैकी 1.587 कोटी शिधाजिन्नस संचांचे (सुमारे 99.89%) पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
सन 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त व दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस संचांचे वितरण:-
दि.22.08.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रथमत: गौरी-गणपती उत्सवानिमित्त (दि.19 सप्टेंबर, 2023) प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच व तद्नंतर दिवाळी सणानिमित्त (दि.12 नोव्हेंबर, 2023) प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच याप्रमाणे प्रतिशिधापत्रिका 2 शिधाजिन्नस संच स्वतंत्ररित्या वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रथमत: गौरी- गणपती उत्सवानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या 1.57 कोटी शिधाजिन्नस संचांपैकी 1.568 कोटी शिधाजिन्नस संचांचे (सुमारे 99.95%) पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
तथापि, दि.03.10.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार, आगामी दिवाळी सणानिमित्त वितरीत करावयाच्या “आनंदाचा शिधा” संचात प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात पोहा व मैदा या दोन शिधाजिन्नसांचा नव्याने समावेश करण्यात आला असून त्यानुसार, राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी सन 2023 मधील दिवाळी सणानिमित्त 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे 6 शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या 1.58 कोटी शिधाजिन्नस संचांपैकी 1.578 कोटी शिधाजिन्नस संचांचे (सुमारे 99.70%) पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
सन 2024 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व आगामी शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधासंचाचे वितरण:-
दि.11.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण 1,60,29,362 शिधापत्रिकाधारकांना सन 2024 मधील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (दिनांक 22.01.2024) व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (दिनांक 19.02.2024) 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात चणाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे ₹ 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या 1.60 शिधाजिन्नस संचांपैकी 1.589 कोटी शिधाजिन्नस संचांचे (सुमारे 99.16%) पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
लाभार्थी:
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना
फायदे:
प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच
अर्ज कसा करावा
तुमच्या रास्त भाव दुकानाला भेट द्या