राज्यातील शिधापत्रिका
ई-शिधापत्रिका
राज्यामध्ये दि. 5 मे, 1999 पासून तिहेरी कार्ड योजना लागू करण्यात आली होती. त्यानुषंगाने राज्यामध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांना निकषाप्रमाणे तीन रंगाच्या शिधापत्रिका वितरीत करण्यात येत होत्या. तद्नंतर शासन निर्णय़ 21.02.2023 अन्वये अंत्योदय अन्न योजना(एएवाय), प्राधान्य कुटुंब योजना(पीएचएच), एपीएल शेतकरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (एनपीएच) व एपीएल शेतकरी व्यतिरिक्त व एपीएल शुभ्र शिधापत्रिका धारकांना विहितशुल्क आकारून ई-शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत निर्णय़ घेण्यात आला आहे. तद्नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (एएवाय) व प्राधान्य कुटुंब योजना (पीएचएच)) व राज्य योजनेच्या (आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल शेतकरी) अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा दि.16.05.2023 च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यात ई-शिधापत्रिकांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येते.
(जानेवारी, 2024)
एएवाय | पीएचएच | एपीएल शेतकरी | एनपीएच | एकूण |
---|---|---|---|---|
2478361 | 13605051 | 766691 | 5601947 | 22452050 |